भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यरावेर

गोलवाडे गावात “आर्ट ऑफ लिव्हींग” शिबिर यशस्वी पणे संपन्न…..

गोलवाडे, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज. जीवन महाजन |
गोलवाडे गावामध्ये आर्ट ऑफ लिव्हीगचे सदस्य श्री भास्कर रावते आणि श्रीमती रंजनाताई रावते यांच्या मार्गदर्शनाखाली आर्ट ऑफ लिव्हींगचे शिबिर पार पडले.गोलवाडे गावाचे प्रगतशील शेतकरी श्री ईश्वर काशिनाथ तायडे यांच्या आग्रहास्तव रावते दाम्पत्याने हे शिबिर घेतले.

सदस्या”आर्ट ऑफ लिव्हिंग” (Art of Living) ही एक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आहे, जी श्री श्री रविशंकर (Sri Sri Ravi Shankar) यांनी 1981 साली स्थापन केली. याचा उद्देश म्हणजे मानसिक, शारीरिक व आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी विविध योग, ध्यान व श्वसन तंत्र शिकवणे.र्ट “आर्ट ऑफ लिव्हिंग” म्हणजे “जीवन जगण्याची कला” — म्हणजेच तणावमुक्त, समाधानी व सकारात्मक जीवन जगण्याचा मार्ग. यामध्ये विविध शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक तंत्रांचा उपयोग केला जातो.मुख्य तत्त्वे आणि उपक्रम:

  1. सुदर्शन क्रिया (Sudarshan Kriya):
    हे एक विशेष श्वसन तंत्र आहे.
    श्वसनाच्या लयीने मन, शरीर आणि भावना यांचा समतोल साधतो.यामुळे तणाव कमी होतो, मन शांत होते, आणि ऊर्जा वाढते.2. ध्यान व योग (Meditation & Yoga):
    दररोज ध्यान व योगासने शिकवली जातात.एकाग्रता व मानसिक शांतता वाढते.
  2. सकारात्मक जीवनदृष्टी:
    माफ करणे, आभार मानणे, सेवा करणे यावर भर.
    छोट्या गोष्टींत आनंद शोधणे.
  3. मानसिक आरोग्य आणि भावनिक समतोल:
    आत्मचिंतन, आत्मविश्वास आणि भावनिक संतुलनावर मार्गदर्शन.

अशा अनेक विषयांवर रावते दाम्पत्यांनी मार्गदर्शन केले…. तसेच माडीशोधन प्राणायाम बसेल का प्राणायाम या प्राण्यांच्या क्रिया घेतल्या.. शेवटी ध्यान घेतले.. सदर कार्यक्रमाला गावातील महिला,पुरुष,लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.उत्तम पाटील,श्री संतोष महाजन,श्री गोपाळ महाजन,श्री श्रीराम शेलोरे, श्री जीवन महाजन यांनी प्रयत्न केले.. शेवटी श्री नारायण तायडे सर तसेच श्रीमती दिपाली महेंद्र धनगर यांनी आर्ट ऑफ लिव्हींगच्या शिबिराविषयी मनोगत व्यक्त केले व आयोजकांचे आभार मानले..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!