भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

ऐनपुर महाविद्यालयात “कारगिल विजय दिवस” निमित्ताने भूमिपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

ऐनपूर, ता.रावेर. मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | रावेर तालुक्यातील ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात कारगिल विजय दिवस निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा डॉ पी आर महाजन हे होते तर प्रमूख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ एस एन वैष्णव, डॉ जे पी नेहेते होते. सुरुवातीला डॉ एस एन वैष्णव यांनी कारगिल युद्धा कशा पद्धतीने लढले तर डॉ जे पी नेहेते यांनी कारगिल युद्धात आपल्या सैनिकांनी केलेल्या पराक्रमाची यशोगाथा सांगितली.

तसेच प्रा एस आर इंगळे यांनी आपल्या सैनिकांनी दाखविलेल्या शौर्य बद्दल माहिती दिली.तर अध्यक्षीय भाषणात डॉ पी आर महाजन यांनी कारगिल विजय दिवसाविषयी माहिती दिली. नंतर शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा हेमंत बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ डी बी पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री हर्षल पाटील व श्री श्रेयस पाटील यांनी मेहनत घेतली

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!