१४ जानेवारी पर्यंत जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश, ‘या’वर घातली आहे बंदी?
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी तसेच विविध स्वरुपाची सण, उत्सव, थोर पुरुषांच्या जयंती या साजऱ्या होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ००.०१ वाजेपासून ते १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०० वाजे पर्यंत हे प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहे. आदेशान्वये शस्त्र बाळगणे, स्फोटके, धोकादायक वस्तू वापरणे, प्रतिमा दहन तसेच पोलिस अधिक्षक, जळगाव यांच्या पुर्व परवानगी शिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच सरकारी कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न समारंभ व धार्मिक मिरवणुका तसेच शासनाच्या सेवेतील व्यक्तीना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, त्यांना हा आदेश लागू राहणार नाही,असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे
