भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपाचोरा

पोलीस उपनिरीक्षकांचे घर जाळण्याचा प्रयत्न, पोलिस उपनिरीक्षकाच्या मेहुण्यासह तिघांना अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | पोलिस उपनिरीक्षकाच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातून उघडकीस आली.या प्रकरणी मुख्यसुत्रधार पोलिस उप निरीक्षकांच्या मेहुण्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

पत्नीला खावटी देण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. याचा राग मनात धरुन पत्नी तसेच तिची आई राहत असलेल्या नगरदेवळा येथील घरावर पेट्रोल ओतुन जाळण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी एलसीबीचे पीडित महिलेच्या पतीला तसेच त्याच्या साथीदाराला ताब्यात घेताच कारनामे उघड झाले. संशयित दुचाकी चोरी करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पथकाने त्यांच्या कडील चोरीच्या नऊ दुचाकी हस्तगत केल्या. अनेक पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

नगरदेवळा (ता.पाचोरा) येथील राऊळ गल्लीत मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र राऊळ यांच्या घरावर रात्री अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली होती.. राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असे अटकेतील फिर्यादी म हिलेच्या पतीचे नाव आहे. या घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे.

नगरदेवळा राहूळ येथे महिला तिच्या आईसह घरात झोपली होती. तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी घराच्या मुख्य दरवाजावर पेट्रोल ओतून आग लावली होती. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या होता. मार्गदर्शनाखाली सुरु

तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबी पथकाने सुरुवातीला संशयित आरोपी गणेश बाबुराव पाटील (रा. कळमसरा) याला ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली देताना त्याचा साथीदार समाधान बळीराम निकम याच्या मदतीने हे कृत्य केल्याचे त्याने मान्य केले. तपासात या गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार फिर्यादी महिलेचा पती राहुल वसंतसिंग पाटील (रा. जामनेर) असल्याचे वास्तव समोर आल्याने राहुल पाटील यालाही अटक करण्यात आली. या अटकेतील आरोपी गणेश बाबुराव पाटील व आरोपी राहुल वसंतराव पाटील यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी समाधान बळीराम निकम हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान राहुल पाटील व त्याची पत्नी यांच्यात न्यायालयीन वाद सुरु आहे. दरमहा वीस हजार रुपये पोटगी महिलेस द्यावी, असे आदेश न्यायालयाने राहुल याला दिले होते. त्याचा सूड घेण्यासाठी राहुलने दोघा साथीदारांना दोन लाख रुपयांची सुपारी दिली. त्यापैकी एक लाख रुपये आगाऊ देऊन त्याने हे कृत्य घडवून आणले.

संशयित आरोपी गणेश पाटील याच्या सखोल चौकशीतून त्याने विविध जिल्ह्यांतून मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून एकूण नऊ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. या तपासात पाचोरा, एमआयडीसी, भोकरदन (जि. जालना), शेगाव लोहमार्ग (संभाजीनगर), सलाबतपुरा (सुरत, गुजरात), बोदवड (जि. जळगाव) येथे दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक रामेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शेखर डोमाळे, अंमलदार लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, हेमंत पाटील, रतन गिते, जितू पाटील, ईश्वर पाटील, राहुल महाजन, सचिन घुगे, बाबासाहेब पाटील, दिनेश पाटील आणि सायबर सेलचे मिलिंद जाधव यांनी पार पाडली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश गणगे हे करत आहेत

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!