पिक विमा घोटाळा : रावेर तालुक्यात पीक विमा घोटाळ्यात मध्यस्थी, दलालांची टोळी,यात आणखी कोण कोण सामील?
रावेर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात केळी पिक लागवड नसलेल्या ४४ हजार ४१ हेक्टर क्षेत्रावर केळी पिक दाखवून २१७ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला.
रावेर तालुक्यात केळी पीक विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम केळी पिक नसताना केळी पिक दाखवून तसेच दुसऱ्याच्या शेतीला स्वतःचे नाव दाखवून (बँक खाते नंबर लाऊन ) हळपल्या असल्याचे प्रकार घडले आहेत.
रावेर तालुक्यांतील कोचुर परिसरातील काही लोकांनी रावेर तालुक्यातीलच वडगाव, जानोरी, चीचाटी आदी गावातील शेतकऱ्यांच्या शेती उताऱ्या ला आपले नाव व बँक खाते मोबाईल नंबर लावून पीक विम्याचे करोडो रुपये हळपल्या ची खात्रीलायक माहिती असून याचीही चौकशी करण्यात यावी अशीही मागणी केली जात आहे.
केळी पीक विमा मंजुरीसाठी काही तज्ञ तरुण लॅपटॉप घेऊन तालुका भर हिंडत होते आणि पैसे घेऊन केळी पिक नसलेल्या शेतात केळी लागवड दाखवून नोंदी केल्या जात होत्या. केळी पीक विमा मंजूर करणाऱ्या टोळीने गेल्या दोन-तीन वर्षात कोट्यावधी रुपयाची माया जमविली आहे..
यात दलाल आणि मध्यस्थी कोण आहेत याबाबत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
केळी पिक विमा योजनेत शेतकऱ्यांच्या टाळू वरील लोणी खाताना कोट्यावधी रुपयांच्या उलाढालीत संबंधित काही तलाठी, कृषी खात्याशी संबंधित काही कर्मचारी, काही स्टॅम्पेंडर, ऑनलाइन काम करणारी यंत्रणा, काही अधिकारी,विमा कंपनीचे एजंट आणि विमा कंपनीशी संपर्कात असणारे मध्यस्थी दलाल कोण कोण सक्रिय होते आणि आहेत..? आणि शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जेवढी मिळणार आहे त्याच्या निम्मे म्हणजे ५० टक्के रक्कम आधी शेतकऱ्याला रोख स्वरूपात खर्च करावी लागली, आणि ही ५० टक्के रक्कम कोणाच्या सहकार्याने आणि कोणा कोणाच्या आशीर्वादामुळे कोणाकोणामध्ये वाटप झाली याबाबत सुद्धा संपूर्ण यावल रावेर तालुक्यात उघडपणे सार्वजनिक ठिकाणी बोलले जात असून या संदर्भात सुद्धा चौकशी करण्यात यावी.
….(भाग – ३)…

