केळी पिक विमा घोटाळा : बनावट करारनामे करून रावेर तालुक्यात पीक विम्याची कोट्यावधीची रक्कम परस्पर हडप
रावेर, मंडे टू मंडे न्युज । जळगाव जिल्ह्यात फळ पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी लागवड नसलेल्या क्षेत्रावर तब्बल ४४ हजार ४१ हेक्टरवर केली दाखविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. तसेच २५ हजारांपेक्षा जास्त बोगस अर्जदार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रावेर तालुक्यात केळी पीक विम्याची कोट्यवधी रुपयांची रक्कम दुसऱ्याच्या शेतीवर स्वतःचे नाव लावून (बँक खाते नंबर) हळपल्या असल्याची माहिती आहे.
केळी पिक विमा मंजूरिच्या प्रक्रियेमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावाने बनावट करारनामे, बनावट कागदपत्रे तयार करण्याच्या उद्योगात काही संबंधित तलाठी यांनी बनावट सातबारा उतारे तयार करून शेतामध्ये केळी पीक प्रत्यक्ष नसताना केळी पिकाची नोंद करून केळी पीक विमा काढणाऱ्या यंत्रणेला सहकार्य केले,त्यानंतर या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसताना त्यांच्या नावावर केळी पीक विम्याची रक्कम हडप करण्यात आली तर काही शेतकऱ्यांना केळी पीक विमा मंजूर करण्यासाठी काही मध्यस्थी दलालांनी मोठमोठ्या आर्थिक रकमा घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली.केळी पीक विमा प्रकरणांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर शंभर रुपयाचे स्टॅम्प कोणाच्या नावावर आणि कोणी दिले आणि कोणाच्या स्वाक्षरीने दिले हा सुद्धा कायदेशीर मुद्दा रावेर तालुक्यात उपस्थित केला जात आहे. याचीही चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
…(भाग …२)…

