भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

डंपरच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाकडून वाहनाची तोडफोड

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | जळगाव मधून एक दुःखद घटना समोर आली असून जळगाव शहरातील कालिंका माता चौकात एका भरधाव डंपरने ५७ वर्षीय वृद्धाला चिरडल्याची भीषण घटना घडली. या अपघातात प्रभाकर रघुनाथ पाटील (वय ५७) यांचा जागीच मृत्यू झाला असून, घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. संतप्त जमावाने डंपरची दगडफेक करून तोडफोड केली आहे.

प्रभाकर रघुनाथ पाटील हे हात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह जेकरतात. ते बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेले होते. बाजारातून भाजीपाला घेऊन आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक मोबाईलवर बोलण्यात मग्न होता. चालकाचे लक्ष नसल्याने डंपरचे चाक थेट पाटील यांच्या चेहऱ्यावरून गेले, ज्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. संतापलेल्या जमावाने डंपरवर जोरदार दगडफेक करत त्याची तोडफोड केली. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी घटनास्थळी दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याच कालिंका माता चौकात साधारण वर्षभरापूर्वी एका बालकाचाही डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!