पदाचा गैरवापर करीत बॅक शाखाधिकाऱ्याने केली कोट्यावधीची रक्कम हडप
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज,अक्षय काठोके | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व बोदवड शाखेत कार्यरत असतांना गोर-गरीबांचा विश्वास संपादन करुन त्यांचे नावे कर्ज मंजुर करीत कोट्यावधी रुपयाची रक्कम परस्पर हडप केल्याचा प्रकार समोर आला असुन या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
बाळु धोंडु टाकरखेडे,समाधान नत्थु भोई,विनोद पाटील व सुरेश भोई आदी लोकांच्या या टोळी ने हा अपहार केल्याचे पोलीसांना दिलेल्या निवेदनातुन समोर येत आहे.
जळगाव जनता बॅकेचा तत्कालीन शाखाधिकारी बाळु टाकरखेडे याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील ‘ब्लिज मार्ट’ नामक कंपनीचा मालक संतोष कुचेकर यांच्याशी संगनमत करीत तसेच परीसरातील काही स्थानिक एजंट यांना हाताशी घेत परीसरातील गोर-गरीब लोकांचा विश्वास संपादन करुन,तर काहींना विविध आमिषे दाखवुन तर काहींचा निरक्षरतेचा फायदा घेत तुमचे कर्ज प्रकरण मंजुर करुन देतो असे सांगत त्यांच्या नावे प्रत्येकी ५ -५ लाखांचे कर्ज काढुन अंदाजे १४-१५ कोटी रुपयाचा अपहार केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. अपहार केलेली रक्कम परस्पर हडप केली असल्याचा आरोप परीसरातुन फसवणुक झालेल्या तक्रारदारांकडुन केली जात आहे.
याप्रकरणी बोदवड पोलीस ठाणे व पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक खातेदारांनी एकत्र येत निवेदन दिले आहे. दरम्यान याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाकडुन तपासाची सुरुवात झाली असुन या प्रकारामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
सन २०२२-२३ मध्ये संशयित बाळु टाकरखेडे हा मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा-काकोडा येथील जळगाव जनता बैंकेत शाखाधिकारी पदावर कार्यरत असतांना, पदाचा तसेच परीसरातुन असलेल्या लोकांच्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध होत आहे. विशेष म्हणजे बॅकेत असलेला सिक्युरिटी गार्ड ला १५ लाखात गंडविलेले आहे.
सर्वप्रथम साधा-सरळ स्वभाव असलेल्या लोकांशी संपर्क वाढवत त्यांचा विश्वास संपादन करायचा. काही लोकांना एका ब्लिज ट्रेडिंग कंपनीच्या निवाखाली करारनामा लिहुन, तर काहींना वेगवेगळी पद्धत वापरुन फसवले . तर काही लोकांना, त्यांच्या समस्या जाणून त्यांप्रकारे त्यांना विविध प्रकारचे आमिष दाखवुन तसेच काहींचा निरक्षरतेचा गैरफायदा घेत काहींच्या घरोघरी जावुन त्यांच्याकडुन कर्जप्रकरणावर हव्या तशा सह्या अंगठे घेत त्यांच्या नावे प्रत्येकी ५ लाखाचे लोन म़जुर करुन ती रक्कम परस्पर काढुन हडप केल्याचा पराक्रम संशयित शाखाधिकारी बाळु धोंडु टाकरखेडे यांनी केला आहे. यानंतर बाळु टाकरखेडे याची बदली बोदवड येथील शाखेत झाली.तिथेही काही लोकांची अशाच पद्धतीने फसवणुक केली. कर्ज रक्कम वापरण्याच्या बदल्यात काही लोकांना भुसावळ तालुक्यातील मौजे काहुरखेडा शिवारात प्रत्येकी हजार स्के.फु मोकळ्या प्लाॅटी खरेदी करुन लुबाडण्यात आले असल्याचेही उघड झाले आहे.
दरम्यान लोकांच्या नावे काढलेले काहींचे कर्जाचे हप्ते सुरुवातीला वर्ष-दिड वर्ष व्यवस्थित भरले गेले आणि यानंतर हप्ते थकल्यानंतर बॅकेकडुन नोटीस मिळायला लागल्यानंतर ‘आपली फसवणुक झाली असल्याचा प्रकार लक्षात आला.याबाबत बाळु टाकरखेडे यांच्याशी संपर्क साधला असता, कंपनीचे नाव मध्ये घालून लोकांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला तसेच कंपनीच्या काही अडचणी आल्या असल्यामुळे हप्ते थकलेले आहे काही दिवसांनंतर कंपनी तुमचे नावे घेतलेलं कर्ज भरेल असे सांगत होता. बॅक शाखाधिकारी पदावर कार्यरत असल्यामुळे लोकांना विश्वास पटत होता.तसेच एजंट मार्फत लोकांना भुलावण्याचा प्रकार तो करीत होता. स्थानिक एजंट व शाखाधिकारी ओळख परीचयाचे असल्याने,त्यांनी घेतलेलं कर्ज भरतील या अपेक्षेतुन याबाबत आजतागत कुणी तक्रार केली नव्हती. मात्र वर्षभरापासुन हप्ते थकल्यामुळे सदरचे प्रकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पोहचल्याने लोकांची खात्री पटली कि,आपली नियोजनबद्ध रीत्या फसवणुक झाली आहे आणी दोन-चार किंवा दहा-बारा नाही तर तब्बल दिड-दोनशे लोकांची यांनी अशाच प्रकारे फसवणुक केली असल्याचे लक्षात आले.
फसवणुक झालेल्या खातेदांनी बॅकेकडे याबाबत तक्रारी दिल्या, जळगाव येथील जिल्हा शाखेपर्यत पोहचुन लोकांनी वरीष्ठ अधिकारी यांचेसमोर आपापली व्यथा मांडली.मात्र पाहीजे तेवढा प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसात निवेदनाद्वारे आपली व्यथा मांडली. दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेकडुन याप्रकरणी तपासाची चक्रे फिरण्यास सुरुवात झाली आहे.
याबाबत बॅकेची भुमिका जाणुन घेण्याचा प्रयत्न केला असता, विद्यमान शाखाधिकारी यांनी प्रतिक्रिया द्यायची टाळली.जिल्हा शाखेतील एका अधिकाऱ्याशी संपर्क साधुन याबाबत विचारणा केली असता, त्यांनी ‘मला काहीच माहीती नसल्याचे सांगितले.पोलीस तपासात काय निष्पन्न होईल याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागुन आहे.

