टाळ मृदंगाच्या गजरात कुंभारखेडा येथे निघाली बाप्पाची मिरवणूक
कुंभारखेडा ता.रावेर मंडे टू मंडे, प्रतिनिधी (प्रा योगेश कोष्टी) येथील ओंकारेश्वर नगरातील ओंकारेश्वर मंदिरात परिसरातील बाल गोपाल तर्फे बसविण्यात आलेल्या गणपती बाप्पाचे आज टाळ मृदंगाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. बॅड आणि डीजे या गोष्टीला फाटा देऊन बापाला टाळ मृदंगाच्या साथीने हरिनामाच्या गजरात निरोप देण्यात आला किंबहुना याच कारणास्तव कुंभारखेडातील वातावरण भावूक आणि भक्तिमय झालेले होते. या आगळ्यावेगळ्या मिरवणुकीने या बालगोपालांनी ग्रामस्थांची मने जिंकली.
यावेळेस या बालगोपाल कार्यकर्त्यांना युवराज भारंबे, रमेश कोल्हे, गोपाळ महाजन, गोकुळ बडगुजर, ज्ञानदेव बोंडे,परेश बोंडे, नगीन पाटील, विनोद भारंबे ,ह भ प तुषार महाराज , राजू गावंडे, अनिल बोंडे ,मधुकर बोंडे, संतोष भारंबे, ज्ञानेश्वर महाजन, टीकाराम महाजन यांनी सहकार्य केले. पूर्वेश कोल्हे ,भूमिक कोल्हे, पार्थ बोंडे , वेद महाजन, वेदांत महाजन, जयेश बोंडे ,देवांशु बोंडे, विभास महाजन यांनी महत्वाची भूमिका बजावली. विसर्जन मिरवणुकीत महिला वर्गाने सुद्धा टाळ चिपड्यांच्या सहाय्याने अभंग गाऊन सहभाग घेतला…
