गोमांस तस्करी करणाऱ्या वाहनाचा अपघात, अपघाताने पितळ उघडे, गोमांस जप्त
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | नशिराबाद जवळील बालाजी लॉन शेजारी, मुंजोबा मंदिरा समोरील पाटावर गोमास तस्करी करणाऱ्या अल्टो वाहनाचा अपघात झाला. भुसावळ कडून जळगावकडे भरधाव वेगाने येत असलेली मारुती अल्टो क्रमांक MH 19 BU 9957 ही गाडी अचानक नियंत्रण सुटून दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली. या गाडीत मोठ्या प्रमाणावर गोमास भरलेले होते. या गाडीतील तिन्ही प्रवासी जखमी अवस्थेत अडकून बसले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ कडून जळगाव च्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेली मारुती अल्टो
क्रमांक MH 19 BU 9957 ही गाडी चालकाचे अचानक नियंत्रण सुटून दोन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला पडली.
काही वेळाने घटनास्थळी MH 19 CW 3765 या क्रमांकाची रिक्षा आली. त्यात तीन इसम होते. गावातील काही तरुण मदतीसाठी धावले असता त्या तरूणांना
अल्टो गाडीतून गोमांस काढून रिक्षात भरले जात असल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने गोरक्षकांना संपर्क साधून त्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्याच वेळी मोटारसायकल वर आलेला एक इसम या वाहनांवर पाळत ठेवत होता. अशी माहिती मदत करणाऱ्या तरुणांकडून सांगण्यात आले. लागलीच गोरक्षकांसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र
रिक्षा घेऊन आलेले तिन्ही इसम रिक्षा सोडून पळून गेले.
त्या नंतर गोरक्षक व पोलिसांनी अल्टो वाहनाची तपासणी केली असता त्यांना त्या गाडीत अंदाजे १५० किलो गोमांस भरलेल्या पिशव्यां सापडल्या. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत नशिराबाद पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली. पोलिसांनी अल्टो गाडीमधील कागद तपासले असता त्यात गाडी बाबू पवार, अभोदा खुर्द, रावेर असे गाडीचे कागद मिळाले असून पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.
शेख इंद्र शेख कादर (वय ४५ रा. शनिपेठ) शाहरुख खान आलम खान वय ३२ रा. सुरत, फरहान (पूर्ण नाव माहित नाही) आणि रिक्षा चालक (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास साहेब पोलीस निरीक्षक ए.सी. मनोरे हे करीत आहे

