भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भुसावळ

‘वंदे भारत एक्स्प्रेस’चे नागपूर-पुणे तिकीट दर जाहीर : भुसावळ व जळगाव सह कुठून किती लागणार भाडे? वाचा..

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. १० ऑगस्ट पासून नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीला जळगाव भुसावळला थांबा असल्याने जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना या ट्रेन चा मोठा उपयोग होणार आहे. या ट्रेनला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवी झेंडी दाखवतील.

नुकतेच गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस या ट्रेनचे वेळेपत्रक जाहीर झाले. मात्र या वंदे भारतचे तिकीट दर जाहीर झाला नव्हते. मात्र आता नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस तिकीट दरही समोर आलेय. या अतिजलद रेल्वेत पुणे ते जळगाव चेअर कारचे भाडे १०२० रुपये तर एक्झिक्युटिव्ह कार २०३५ रुपये असेल. तर अजनी ते जळगाव चेअर कार ९४० रुपये व एक्झिक्युटिव्ह कार १८८० रुपये इतके असेल

नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस उद्यापासून धावणार असून पहिल्या दिवशी ही गाडी नागपूर-पुणे ०१००१ या क्रमांकाने धावेल. नंतर ही गाडी २६१०१ (पुणे-अजनी) आणि २६१०२ (अजनी-पुणे) या क्रमांकाने धावणार आहे. रविवार दि. १० रोजी नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे दुपारी ३:५५ वाजता भुसावळात तर जळगावला ४:२६ वाजता आगमन होईल.

असे आहेत वंदे भारतचे भाडे

गाडी क्र. २६१०१ पुणे-अजनी चेअर कार-१५९५ रुपये एक्झिक्युटिव्ह कार – ३१८५ रुपये पुणे ते
जळगाव चेअर कार – १०२० रुपये
एक्झिक्युटिव्ह कार- २०३५ रुपये आहे. पुणे ते भुसावळ चेअर कारचे १०७० रुपये एक्झिक्युटिव्ह कार – २१३० रुपये गाडी क्र. २६१०२ अजनी-पुणे अजनी ते भुसावळ चेअर कार- ८९५ रुपये एक्झिक्युटिव्ह कार – १७८५ रुपये.                                                                     अजनी ते जळगाव चेअर कार ९४० रुपये. एक्झिक्युटिव्ह कार १८८० रुपये.

या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी अजनीहून सोमवार वगळता आणि पुण्याहून मंगळवार वगळता सहा दिवस धावणार आहे. वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्राथमिक देखभाल आणि दुरुस्तीचे काम नागपूर येथे होणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!