भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळणार..! महायुतीच्या नेत्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | महायुती सरकारला महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी गेमचेंजर ठरलेली लाडकी बहिण योजनेमार्फत राज्यातील पात्र महिलाना १५०० रुपये दरमहा मिळतात. या पुढे लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील अशी घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून करण्यात आली होती. मात्र निवडणुका होऊन यात राज्यातील जनतेने मोठा कल देऊन बहुमतांनी निवडून दिले. आता लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की,२१०० रुपये कधी पासून मिळतील. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच आता महायुतीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी २१०० रुपयाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “लाडक्या बहि‍णींना त्यांचे पैसे मिळणार आहेत. १५०० रुपये व्यवस्थित मिळाले की २१०० पण मिळतील. असं छगन भुजबळ म्हणाले. तसेच नवीन योजना आहे. शंका कुशंका उपस्थित करू नये, असंही छगन भुजबळांनी स्पष्ट केलं.

छगन भुजबळ म्हणाले, लाडकी बहीण योजनेत अडचणी आहेत. घरात एखाद्या वेळी खर्च वाढतो तसेच आहे. काही वेळा उशिरा पैसे येतात. शासकीय पैसे कुठेही जात नाही. लाडकी बहीण, लेक लाडकी योजनेचे पैसे इकडे गेले तिकडे गेले तेव्हा इतर मंत्री ठणाणा करतात. लाडक्या बहि‍णींना त्यांचे पैसे मिळणार आहेत, असं भुजबळ म्हणाले. तसेच लाडक्या बहिणींना १५०० रुपये व्यवस्थित मिळाले की, २१०० पण मिळतील. नवीन योजना आहे. असं म्हणत छगन भुजबळ यांनी लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!