भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

सावदा येथे भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव उत्साहात संपन्न

सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यातील सावदा येथे, भुसावळ, रावेर, यावल, मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांचा संयुक्त तालुका स्तरीय भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिन महोत्सव शुक्रवारी, दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी जेहरा मॅरेज हॉल, रावेर रोड, सावदा येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या शुभप्रसंगी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष कविश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबाजी महानुभाव, अमरावती यांचा परिसराच्या वतीने राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि समाजसेवकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. भगवान श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपाप्रसादाने हा महोत्सव भक्ती आणि उत्साहाने परिपूर्ण झाला. कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व ईश्वरीय साधनवंतांनी या सोहळ्याला विशेष रंगत आणली.

याप्रसंगी आचार्य जनार्दन हरी महाराज, राज्य मंत्री संजय भाऊ सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, रावेर यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे, मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील. तसेच रावेर यावल साईनगर परिसरातील सर्व डॉक्टर व पत्रकार बांधवांचे सत्कार आणि सन्मान करण्यात आले.

आचार्य श्री मानेकर बाबा, शाखी आचार्य श्री चोरमांगे बाबा शास्त्री, प्राचार्य श्री राजधर बाबा, शाखी मराठे आचार्य श्री कृष्णराज बाबा शास्त्री पाचराऊत आणि त. वैशालीताई आराध्य, भुसावळ यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महोत्सव सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला.या भव्य सोहळ्याने परिसरातील भक्तांमध्ये आध्यात्मिक चेतना आणि एकतेचा संदेश पसरवला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!