ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात तरुणाची हत्या, यावल तालुक्यात खळबळ
यावल, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात एका २१ वर्षाच्या तरुणाची हत्या झाल्याची घटना यावल तालुक्यातील यावल – दहिगाव रोडवर, विरावली दहिगाव रोडवरील खिरवा रस्त्यावर झाली. ही घटना दिनाक २९ ऑगस्ट रोजी रात्री घडली. हत्या करणाऱ्या ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रविद्र कोळी (वय १९) या आरोपी दोघांनी पोलिसांसमोर पोलिस स्टेशनला जाऊन स्वतःहून आत्मसमर्पण केल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने यावल परिसरात खळबळ उडाली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोजी, रात्री सुमारे ९ .३० वाजेच्या सुमारास यावल-दहिगाव रोडवर
दहिगाव, विरावली दहिगाव रोड वरील खिरवा रस्त्यावर दहिगाव येथील सुरेश आबा नगरचा २१ वर्षीय रहिवाशी इम्रान युनुस पटेल याची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रविद्र कोळी (वय १९) हे दोघे संशयितांनी मोटरसायकलवर येत पोलिस ठाण्यात स्वतःहून आत्मसमर्पण करून हत्या केल्याची माहिती दिली. पोलिसांनी लागलीच घटनास्थळी दाखल झाले असता त्यांना इम्रान हा घटनास्थळी मृत अवस्थेत पोलिसाना आढळला. इम्रान हा मुळ हनुमंतखेडा तालुका धरणगाव येथील राहणारा असुन तो दहिगाव येथे आपल्या मामाच्या गावी राहात होता.
हत्या का केली? या बाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती. पोलिस पुढील तपास करीत असून परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

