भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रसामाजिक

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत, युवा समिती आयोजीत श्री गणेश उत्सव घरगुती गणपती आरास स्पर्धा पारितोषिक वितरण

जळगाव, मंडे टु मंडे न्युज | युवा समिती आयोजित घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धा आयोजित केले होते याकरीता आपल्या समाज बांधवांकडुन ६५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त संपूर्ण भारत भारतातून सहभाग घेतला, त्यास समाजातील बांधवांनी पसंती देवुन तीन बांधवास सर्वाधीक पसंती देवुन विजयी केले.

यामध्ये अंबरनाथ शहर सर्वोत्कृष्ट तसेच विजेता पारितोषिक श्री.भूषण चौधरी(अंबरनाथ)(२७२ पसंती मते) प्रथम क्रमांक-श्री.तेजस धांडे (पुणे)(२१७ पसंतीमते ),द्वितीय क्रमांक-श्री तुषार रवींद्र पाटील (कल्याण)(१३९ पसंती मते ),तृतीय क्रमांक-कु. पायल नत्थु गाजरे (कांदिवली)(११६ पसंती मते)सर्वोत्कृष्ट देखावा विजेता श्री.ललित निखिल जावळे (कल्याण)पर्यावरण पूरक सजावट आणि स्वनिर्मिती मूर्ती सौ. डॉ. वर्षा चौधरी (जळगाव) सर्व विजेत्यांचे सर्व समाज बांधवांकडुन तसेच भोरगाव लेवा पाटीदार पंचायत कुटुंबनायक श्री ललित दादा पाटील आणि मुख्य समिती तर्फे तसेच युवा समिती प्रमुख श्री मयुरेश नरेंद्र कोल्हे आणि सर्व कार्यकारणी आणि पदाधिकारी यांस कडुन मनःपुर्वक अभिनंदन करण्यात आले.

यावेळेस श्री भूषण चौधरी अंबरनाथ यांचे कडे समिती तर्फे विजेत्यांना बक्षीस स्वरूपात आकर्षक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळेस स्पर्धक श्री भूषण चौधरी,ललित जावळे आणि श्री तुषार पाटील यांना बक्षिसे देण्यात आले बाकी बक्षिसे युवा समिती तर्फे विजेत्यांना घरपोहच दिले जाणार आहे. यावेळी उपस्थित युवा समिती प्रमुख श्री.मयुरेश नरेंद्र कोल्हे अंबरनाथ शहर अध्यक्ष श्री प्रशांत अरुण पाटील कल्याण शहर अध्यक्ष श्री योगेश चौधरी सर कार्याध्यक्ष श्री.किरण नेमाडे सचिव सौ.स्मिता चौधरी समितीचे सदस्य प्रतीक वराडे,सौ.मीनाक्षी नारखेडे,सौ.वैशाली पाटील ,सौ.हर्षाली कोल्हे विशाल खाचणे लोकेश चौधरी,युवराज खाचणे डॉ.कुणाल चौधरी तसेच सर्व चौधरी परिवार आणि अंबरनाथ परिसर नागरिक आणि समाजबांधव उपस्थित होते यावेळी चौधरी परिवार तर्फे समिती प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला या उपक्रमास युवलिंक चे उमेश पाटील आणि बदलापूर चे सदस्य यांनी लिंक चे सहाय्याने खूप अनमोल सहकार्य केले आणि या उपक्रम बद्दल थोरमोठ्यांनी युवा समिती चे कौतुक केले आणि असेच कार्यक्रम नेहमी करत राहण्यासाठी आशीर्वाद दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!