भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयरावेर

राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार, रावेरचे माजी आ.अरुण पाटील स्वगृही

रावेर, मंडे टु मंडे न्युज | आज भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय, मुंबई येथे राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा-महायुती सरकारच्या विकासकार्यांनी प्रेरित होऊन पूर्वाश्रमीचे माजी आमदार श्री.अरुण पाटील यांनी कार्यकर्त्यांसह स्वगृही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी रावेर यावल विधानसभा क्षेत्रातील विविध पक्षांतील अनेक प्रमुख पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्त्यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. यामुळे रावेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार पडले आहे.

माजी आमदार अरुण पाटील पाटील यांनी १९९५ व २००४ अशा दोन वेळा भाजपचे रावेर विधानसभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र त्यानंतर २००९ त्यांनी भाजप सोडत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. आज पुन्हा ते स्वगृही भाजप मध्ये प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!