भुसावळ पुन्हा हादरले! कथित थरारक गोळीबार हल्ला, दोन गोळ्या झाडल्या?शहरात खळबळ…
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज | भुसावळ शहरात गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले असून खुनाचे प्रकार शहरात घडत असतानाच पुन्हा गोळीबार झाल्याचा एकाने दावा केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ६ जुलै सोमवार रोजी रात्री साडेनऊ ते दहा दरम्यान भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळील हनुमान मंदिराजवळ बसलेल्या एका तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी दोन गोळ्या झाडल्याचा दावा करण्यात करण्यात आला.पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
बाजारपेठ पोलिसांनी दाव्याच्या अनुषंगाने सोमवारी रात्री बाजारपेठ पोलीस स्टेशनचे राहुल वाघ, चंद्रशेखर गाडगीळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जावून शहानिशा करत प्रत्यक्ष पाहणी केली मात्र पोलिसांना गोळीबारानंतर घटनास्थळी आढळणारी रिकामी पुंगळी आढळली नाही मात्र संबंधित व्यक्तीच्या दाव्यानंतर पोलिसांकडून याबाबत खातरजमा करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिस सूत्रां कडून सांगण्यात आले. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली. फॉरेन्सिक पुरावे संकलित करण्याबरोबरच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून त्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
संबंधित व्यक्तीने गोळी झाडल्याचा दावा केला आहे मात्र रात्री पोलिसांना गोळी झाडल्यानंतरची पुंगळी आढळली नाही. मंगळवारी पुन्हा या भागाची पाहणी करू तसेच साक्षीदार व तक्रारदाराचे म्हणणे ऐकून पुढील कारवाईची दिशा ठरवण्यात येईल. असेबीपोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांचे कडून सांगण्यात आले ..


