महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसला मोठा धक्का, ‘निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही’, काँग्रेसच्याच मोठ्या नेत्याचं कांग्रेस अध्यक्षांना पत्र

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सगळ्याच पक्षांकडून लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराला जोरात सुरूवात झाली आहे. सर्व पक्ष आपला उमेदवार कसा निवडून येईल यावर भर देत असताना कार्यकर्तेही कामाला लागले आहेत, महायुती आणि महाविकासआघाडीकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत, लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे संपले असताना, प्रचार ऐन रंगात आलेला असतानाच काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने काँग्रेसला धक्का दिला आहे. काँग्रेस नेते मोहम्मद आरीफ नसीम खान यांनी आपण काँग्रेसचा प्रचार करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. नसीम खान यांनी याबाबतचं पत्र काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना २६ एप्रिल रोजी पाठवलं आहे. मो.आरिफ नसीम खान यांची काँग्रेसने स्टार कॅम्पेनर म्हणून नियुक्ती केली होती. खान यांच्या या निर्णयाने राज्यातील कांग्रसला मोठा धक्का बसला आहे

एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने हा निर्णय
महाराष्ट्रातल्या एकूण ४८ लोकसभा मतदारसंघा पैकी एकाही मतदार संघा मध्ये महाविकासआघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. अनेक मुस्लिम संस्था आणि पक्ष कार्यकर्त्यांना काँग्रेस निदान एकतरी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवेल, अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने काँग्रेसने एकही मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं नाही. काँग्रेसला मुस्लिम मतं पाहिजे आहेत, पण उमेदवार नको का? असा प्रश्न विचारला जात आहे. मी या प्रश्नाचं उत्तर मुस्लिम जनतेला देऊ शकत नाही, त्यामुळे मी या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करणार नाही, असं नसीम खान यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. याच्या प्रती काँग्रेसचे जन.सेक्रेटरी के सी वेणुगोपाल,मुकुल वासनिक,रमेश चेन्निथाल,नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविल्या असून तसेच या सोबत नसीम खान यांनी आपण काँग्रेसने दिलेल्या स्टार कॅम्पेनर पदाचाही राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात मतदान करणार नाही, असं नसीम खान यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!