जळगावमुक्ताईनगर

मुक्ताईनगर तालुक्यातील “त्या” तरुणाचा अखेर मृत्य

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज. प्रतिनिधी l विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथील तरुणाचा अखेर जळगावात उपचार सुरु असताना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.या तरुणाने बुधवारी २४ एप्रिल रोजी पहाटे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा येथील सोपान किसन खिरोडकर. वय ४०, या कुटुंबासह राहणाऱ्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाने बुधवारी दि. २४ एप्रिल रोजी पहाटे १२ ते १ वाजेच्या दरम्यान नैराश्यातून विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ही घटना लक्षात येताच त्याला उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी अतिदक्षता विभागात दाखल केले होते.
उपचार सुरु असताना संध्याकाळी साडे आठ वाजता सोपान चा अखेर मृत्यू झाला. शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!