भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावमहाराष्ट्रराजकीय

मोठी बातमी! २ डिसेंबर नंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप? भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या थेट विधानाने खळबळ!

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिकिटासाठी अनेक स्थानिक नेते आपल्या सोईच्या पक्षात उडी मारताना दिसून आले. फक्त खुर्ची साठी ज्या पक्षाचा आता पर्यंत विरोध केला. ज्या पक्षाचं आता पर्यंत कुठलेही काम केले नाही त्या पक्षात प्रवेश करून आर्थिक (पैशांच्या) जोरावर उमेदवारीही मिळवली. भाजप , सेना, राष्ट्रवादी या महायुतीत तर याच पक्षांतरामुळे मोठा बेबनाव झाला आहे. आमच्या पक्षातील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे, अशी तक्रार घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे.

असे असतानाच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच नेते निलेश राणे यांनी भाजपाकडून पैसे वाटले जात आहेत, असा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व आरोप- प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी “मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे” असे मोठे आणि खळबळजनक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर महायुतीत लवकरच काहीतरी घडणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आज २७ नोव्हेंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रचारणीमित्त जळगावच्या दौऱ्यावर होते. त्यांच्या याच दौऱ्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारला. यावर बोलताना मात्र रवींद्र चव्हाण यांनी मोठे सूचक विधान केले आहे. मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन, असं थेट आणि मोठं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. निलेश राणे जे आरोप करत आहेत, त्यावर तुमचं काय मत आहे, असे विचारल्यावर हे सर्व आरोप खोटे आहेत, असे थेट स्पष्टीकरण चव्हाण यांनी दिले आहे.

काय होणार २ डिसेंबर नंतर ?
निलेश राणे यांच्याकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी बोलणे टाळले आहे. परंतु त्यांनी बोलताना मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, असे सांगितल्यामुळे २ डिसेंबरनंतर नेमके काय होणार? महायुतीत पडद्यामागे काही हालचाली होत आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे भविष्यात नेमके काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!