मुक्ताईनगरच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य कार्यकर्त्याना, भाजपा साथ द्या- भाजपा नगराध्यक्ष उमेदवार भावना ललित महाजन
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | शहरातील जनमानसाचा माता भगिनीचा कौल निश्चितपणे भाजपालाच मिळणार असून नगसेवकांसह नगराध्यक्ष निवडणुकी निश्चितपणे मुक्ताईनगरच्या जनतेचा, सामान्य कार्यकर्त्यांचा विजय होईल, असा विश्वास पालिका निवडणुकीतील भाजपा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना ललित महाजन यांनी व्यक्त केला आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाच्याशीर्ष नेतृत्वाने मोठी ताकद लावली असून भाजपचे उमेदवार भावना ललित महाजन आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी अक्षरशः पायाला फिंगरी बांधली आहे. जोरदार प्रचार उमेदवारांनी सुरू केला आहे. या प्रचार आतापर्यंत भावना ललित महाजन यांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
मुक्ताईनगरच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवाराना मुक्ताईनगरची जनता साथ नक्की देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा माध्यमातून विकासाची गंगा मुक्ताईनगरत आणण्यासाठी तुमच्या बहिणीला साथ द्या असे आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावना ललित महाजन यांनी मुक्ताईनगर वासियाना केले आहे.
