Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

Latest:

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

maharastra

मोठी बातमी : अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर…१६ वर्षांवरील अल्पवयीनांवर प्रौढांप्रमाणे कारवाई…

मुंबई, मंडे टू मंडे न्यूज |राज्य सरकारने अल्पवयीन गुन्हेगारी संदर्भात  एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत सांगितले की, अल्पवयीन गुन्हेगारांसाठी असलेली वयोमर्यादा १८ वर्षांवरून १६ वर्षांपर्यंत कमी करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीकडे वाढता कल या विषयावर आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बालकांचा वापर गंभीर गुन्हे तसेच अमली पदार्थांच्या वितरणासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सध्या असलेल्या कायदेशीर तरतुदींचा गैरफायदा घेत बालकांकडून गुन्हे घडवून आणले जात असल्याने कायद्यात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, १६ वर्षांखालील मुलांकडूनही गंभीर स्वरूपाचे गुन्हे होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे अशा घटनांचे वैज्ञानिक विश्लेषण करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. तसेच बालकांचा वापर करणाऱ्या टोळ्या व संघटित गुन्हेगारीशी संबंधित व्यक्तींवर अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आवश्यक बदलांचाही विचार केला जाणार आहे.

दरम्यान, लातूर येथे घडलेल्या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ती घटना कौटुंबिक वादातून घडलेली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात सहभाग निष्पन्न झालेल्या विधिसंघर्षित बालकांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!