भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

crimefaizpur

यावल तालुका हादरला ! पाणी मागण्याचा बहाणा अन् ७५ वर्षीय वृद्धेवर लैंगिक अत्याचार ; माणुसकीला काळीमा

४५ वर्षीय नराधम गजाआड

फैजपूर, ता. यावल | मंडे टू मंडे न्यूज |यावल तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. घरात एकट्या असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर ४५ वर्षीय व्यक्तीने जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी घडली. पीडित महिला आपल्या घरात एकटी बसून भुईमुगाच्या शेंगा सोलत होती. याचवेळी रवी चव्हाण. वय ४५ वर्ष. हा तिच्या घरासमोर आला. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. महिला पाणी आणण्यासाठी घरात गेल्यानंतर आरोपी तिच्या पाठीमागून घरात शिरला. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने वृद्ध महिलेवर जबरदस्ती केली. तिला घराच्या मागील बाजूस असलेल्या स्वयंपाकघरात ओढून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे महिला मानसिकदृष्ट्या प्रचंड हादरली. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने तिने सुरुवातीला ही बाब कोणालाही सांगितली नाही.


मात्र, दुसऱ्या दिवशी धीर एकवटत पीडित महिलेने संपूर्ण घटना आपल्या कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रवी चव्हाण याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दीन सय्यद करीत आहेत. या घटनेमुळे  फैजपूर परिसरासह यावल तालुक्यात संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!