भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

मोठी बातमी : सोन्याच्या दरात विक्रमी वाढ ; १ तोळा सोन्या साठी तब्बल एव्हढे रुपये?

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क|सोन्याच्या दरात नेहमीच चढ उतार होत असतो, गेल्या महिनाभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून सोन्याच्या दरात मोठी विक्रमी वाढ झालेली दिसत आहे, झ सोन्याच्या दराने एक मोठा उच्चांक गाठला आहे .सोन्याचे दर प्रतितोळा १ लाख १४ हजार ३०० रुपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या हृदयात मोठी धडकी भरली आहे.

अमेरिकेने जगभर अनेक देशावर लावलेल्या टेरीफनंतर आता अमेरिकन फेडरल बँकेने त्यांच्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून, सोन्याच्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदार वळल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच परिणाम म्हणजे सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.GST सह सोन्याचे दर १ लाख १४ हजार ३०० रुपये इतक्या विक्रमी उंचीवर जाऊन पोहोचले असल्याने सोने विकत घेणे आता सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!