भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

‘एमडी’ ड्रग या अमली पदार्थासह एकाला अटक,एक फरार

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | सुमारे ६० हजार रुपये किमतीच्या सहा ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) ड्रग या अमली पदार्थासह महमूद हनीफ पटेल (वय ३५, रा. मास्टर कॉलनी) या व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील तांबापुरा परिसरातील जे.के. शनिवार रोजी रात्री अटक केली. मात्र त्याचा साथीदार अरमान चिंधा पटेल हा पळून गेला.

स्थानिक गुन्हे शाखेला अमली पदार्थ विक्रीसाठी काही लोक जे.के. पार्कजवळच्या स्विमिंग टँक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून महमूद हनीफ पटेल याला ताब्यात घेण्यात आले. त्याचा साथीदार अरमान चिंधा पटेल हा मात्र फरार झाला. महमूद पटेल यांची झडती घेतली असता, ६० हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम एमडी तसेच दोन मोबाईल फोन असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या महमूद हनीफ पटेल आणि फरार असलेल्या अरमान चिंधा पटेल या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!