आताची मोठी बातमी : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे भाजप प्रवेशाचे संकेत?
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राजकारणात केव्हा काय घडेल हे सांगता येत नाही, राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, राज्यात महायुतीची सरकार स्थापन झालं, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली.
” कधी मी भाजपमध्ये होतो, त्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये परत आलो, पुन्हा मी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला. व्यक्तिगत द्वेष नसतो. राजकीय दृष्या एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत एकमेकांची दुश्मनी असते असं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याशी तात्विक मतभेद माझे होते. आजही आहेत. पुढच्या कालखंडात कदाचित मिटू शकतील. व्यक्तिगतरित्या आपले त्यांच्या सोबत चांगले संबंध आहेत”. असं म्हणत एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस सरकार सोबत दिलजमाई करण्याचे संकेत दिले आहेत
“भारत – पाकिस्तान प्रमाणे आमच्यामध्ये युद्ध चाललं होतं असं काही नव्हतं. एकमेकांबद्दल काही काळ तणाव असू शकतो. आजही देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध चांगले आहेत, आजही त्यांच्याशी माझं बोलणं होतं. दिल जमाई हा विषय नाही. मात्र तात्विक मतभेद मिटले तर एकमेकांशी अधिक जवळचा संबंध येऊ शकतो. असं म्हणत खडसे पुढे म्हणाले की, सोबत न यायला काय झालं? आमचं काय भारत पाकिस्तानचे युद्ध आहे का? राजकीय जीवनामध्ये तुम्हाला वेळेनुसार भूमिका या नक्की बदलाव्याच लागतात, स्वीकाराव्यां लागतात. या वक्तव्याने पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिलेत का? त्यामुळे आता एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.