ब्रेकिंग : वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसह “या” ग्राहकांना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज | देहविक्री चा व्यवसाय करणाऱ्या महिला सह सात ग्राहकांवर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली.अमळनेर येथील गांधलीपुरा भागात अमळनेर पोलिसांनी कारवाई करत सात ग्राहकांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन देहविक्री करवून घेणाऱ्या तीन महिलांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून अमळनेर येथील गांधलीपुरा परिसरात अनेक घरांमध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर डीवायएसपी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वा खाली पथकाने १ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजता खासगी वाहनातून येऊन छापा टाकण्यात आला.
यावेळी वेगवेगळ्या घरांमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. काही घरांमध्ये काही ठिकाणी काही ग्राहकही सापडून आले .
या कारवाईत ग्राहक म्हणून शाहरुख शेख असलम (३०, खडकपूरा, पाळधी), समाधान मांगलू पाटील (३२, शिरसमणी), उदय दिलीप शितोळे (४०, भडगाव), निखील बापू बच्छाव (१९, पिंप्री), बस्तीलाल गोविंदा पाटील (३३, खडके खु., एरंडोल), जावेद शेख सत्तार (४२, गांधलीपुरा), नामदेव वामनराव बडगुजर (७८, चाळीसगाव) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली.
तसेच या ठिकाणाहून देह विक्रीसाठी अडकवून ठेवलेल्या सहा पीडित मुलींची (महिलांची) यशस्वीरित्या सुटका करण्यात आली. पीडित महिलांना अडकून ठेवून त्यांच्याकडून बळजबरीने देह विक्रीचा व्यवसाय करून घेणाऱ्या जुमाबाई (पूर्ण नाव अज्ञात), शशिकला मदन बडगुजर (वय ३०) आणि मीना दीपक मिस्तरी (वय ६०) (तिघे रा. गांधलीपुरा, जळगाव) यांच्या विरोधात ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ठिकाणी ग्राहकांकडून देह विक्रीसाठी १,००० रुपये घेतले जात होते आणि त्यातील ५०० रुपये पीडित महिलांना दिले जात होते.
सदरची कारवाई डीवायएसपी विनायक कोते यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलिस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, समाधान गायकवाड, महिला होमगार्ड व इतर पोलिस अधिकारी यांनी केली .याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या फिर्यादी वरून पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


