भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

धनुष्यबाण कोणाचा, शिंदे की ठाकरे? चिन्हा साठी ठाकरे पुन्हा सुप्रीम कोर्टात

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | एक मोठी बातमी राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन करण्यात आलं आहे. या प्रकरणावर आता येत्या १६ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात अशी मागणी करण्यात आली आहे की, गेल्या दोन वर्षां पासून हे प्रकरण प्रलंबित असून हे प्रकरण लवकर बोर्डावर घ्या.

१७ फ्रेब्रुवारी २०२३ ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आता १६ जुलैला सुनावणी होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील काही महिन्यात घोषित होणार असल्याचा निवडणुकांचा हवाला देत चिन्हावर सुनावणीची मागणी करत असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे.

मात्र दुसरीकडे तातडीच्या सुनावणीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली. आणि त्यातून पक्षाचे दोन गट पडले. एक शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट. शिवसेनेतील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं, आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आणि त्याची सुनावणी १६ जुलैला ‘सुप्रीम’ कोर्टात होणार असून “धनुष्यबाण ” कोणाचा, शिंदे की ठाकरे? हे कळेल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!