ब्रेकिंग : नगर भूमापन अधिकाऱ्याला १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी नगर भूमापन अधिकारी भास्कर गंगाधर वाघमोडे, वय- ५५ वर्ष. याना १० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या प्लॉटच्या मिळकत पत्रिकेवरील चुकीने नोंद झालेले क्षेत्र दुरुस्ती करण्यासाठी सदर प्लॉटच्या मूळ मालकाने नगर भूमापन कार्यालय, धुळे येथे अर्ज केलेला होता.
सदर अर्जावरून भास्कर गंगाधर वाघमोडे नगर भूमापन अधिकारी धुळे. यांनी क्षेत्र दुरुस्ती करण्याचे आदेश काढले होते.सदर आदेशावरून मिळकत पत्रिकेवर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी वाघमोडे यांनी २०,००० /- रु.लाचेची मागणी करून १०,००० /-रुपये तक्रारदार यांच्याकडून स्वीकारून उर्वरित १०,०००/-रु लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता भूमापन अधिकारी वाघमोडे यांनी त्यांच्या कार्यालयातील परिरक्षण भूमापक हर्षल खोंडे यांच्याकरिता १०,००० /-रु. लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम तक्रारदार यांचे कडून स्वतः स्वीकारल्याने भास्कर गंगाधर वाघमोडे,वय- ५५ वर्ष ,पद- नगर भूमापन अधिकारी धुळे, वर्ग-२ रा.सुयोग कॉलनी,जि.टी.पी स्टॉप, देवपूर, धुळे,जि. धुळे. यांना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे
पोलीस उपअधीक्षक, लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे, सापळा अधिकारी- पंकज शिंदे, पो. निरी. ला.प्र. विभाग धुळे. पो. हवा. राजन कदम, पो.कॉ.रामदास बारेला,मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यांनी केली.