भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : राज्यात भूकंपाचे धक्के, जमिनीतून गुढ आवाज, घाबरून लोक घरा बाहेर पळत रस्त्यावर

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज शनिवारी सकाळी ८ ४६ च्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. अचानक घरे हादरू लागली, भांडी पडू लागल्याने एकच खळबळ उडाली. घाबरलेले लोक घरातून बाहेर पळत रस्त्यावर जमा झाले. ही घटना आज दिनाक ११ एप्रिल रोजी सकाळी ८ .४६ वाजता मराठवाड्यात घडली. सुदैवाने भूकंपाची तीव्रता कमी असल्याने जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

सकाळी ८.४५ वाजता भूकंपाचे सौम्य हादरे
मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांतील काही भागात आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तसेच विदर्भातील यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात देखील हादरले बसले. पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी परिसरात सकाळी ८.४५ वाजता सौम्य हादरे जाणवले. तर वाशिम शहर आणि आजूबाजूच्या प्रदेश देखील हादरला.

भूकंप ४.७ रिश्टर स्केल
गेल्या काही काळात हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात काही गावांमध्ये भूगर्भातून गूढ आवाज आणि हादरे बसण्याचे सत्र सुरू आहे. आज हिंगोली शहरात देखील धक्के जाणवले. हिंगोलीतील पांग्रा शिंदे हे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. हा भूकंप ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा होता, अशी माहिती छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले.

सतर्कतेचे आवाहन
दरम्यान, अचानक आलेल्या भूकंपाने नागरिकांत खळबळ उडाली. लहान मुले, महिला मोकळ्या मैदानाकडे धावत सुटले. मात्र हे भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असून कुणीही अफवा पसरवू नये. घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!