महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : एकनाथ खडसे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नाथाभाऊ यांची भाजपमध्ये घरवापसी? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची मोठी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा उलथापालथ होणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भेट घेतली. एकनाथ खडसे यांच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीच्या वेळी मंत्री गिरीश महाजनही सागर बंगल्यावर उपस्थित होते.

एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. भेटी दरम्यान काय चर्चा झाली हे समजू शकले नसले तरी राज्याच्या राजकारणात काही मोठी घडामोड होणार का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

भेटीत काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नसलं तरी राजकारणात काहीही होऊ शकतं.. माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये घरवापासी होणार का? अशा चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकी दरम्यान पूर्वाश्रमीचे भाजपचे माजी मंत्री व सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार गट) आमदार एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा होत्या. यासाठी एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये जाऊन अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेटही घेऊन लवकरच आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशी घोषणाच करून टाकली होती.

मात्र लोकसभा निवडणुकीनंतरही एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही, राज्यातील नेत्यांमुळे आपला भाजप प्रवेश रखडला, असं एकनाथ खडसे म्हणाले होते. परंतु आता एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने भेटीचे कारण समोर आलेले नसल्याने नाथाभाऊ यांची भाजपमध्ये पुन्हा घरवापसी होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!