भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : जळगाव मध्ये मोठी कारवाई ; माजी महापौर पोलिसांच्या ताब्यात, काय आहे प्रकरण?

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव शहरा जवळ तीन ते चार किलोमीटर असलेल्या मुमुराबाद जवळील एका sk फार्म हाऊसवर पोलिसांनी आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान धाड टाकली असता. या ठिकाणी ऑनलाइन ट्रेडिंग द्वारे फ्रॉड सुरू असल्याचे समोर आले. या ठिकाणाहून परदेशी नागरिकांना फसविले जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणी जळगाव येथील माजी महापौर यांचे सह आठ जणांना ताब्यात घेतले आहेत. आणखी आरोपींमध्ये चार जण कलकत्ता येथील असून काही जळगाव येथील असल्याचेही अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून ३१ लॅपटॉप ही जप्त करण्यात आल्याने जळगाव मध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरानजीक असलेल्या ममुराबाद रोडवर असलेल्या एस के फार्म हाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी एक वाजेच्या सुमारास कारवाई केली असता या ठिकाणाहून ऑनलाइन ट्रेडिंग करणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेतले आहे. हे चारही जण कलकत्ता येथील असून या ठिकाणी एकूण २५ जण काम करीत असल्याचे सांगितले. आज सुटी असल्याने १९ ते २० जण सुटीवर गेलेले आहेत.

त्या ठिकाणाहून ३१ लॅपटॉप व इतर साहित्य पोलिसांनी सील केले असून. त्यांच्यासोबत असलेला काही मुद्देमाल देखील ताब्यात घेतला आहे. अकबर,आदिल व इम्रान हे तीन लोक मुंबई येथून हे हॅण्डल करीत होते. या प्रकरणात पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांचे सह नरेंद्र चंदू व राजेश चंदू ,आली,  शाबाज, असे आठ संशयित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ताब्यात घेतली असून पुढील कारवाई सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!