भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर, या ११ जणांना संधी, जळगाव मधून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात जळगाव मधून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ११ जागांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात जळगाव मधून नंदकिशोर महाजन, धाराशिव लातूर बीडमधून बसवराज पाटील, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर, अमरावतीतून प्रविण पोटे पाटील, तसेच नागपूरमधून डॉ.राजीव पोतदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपचे ११ उमेदवार
जळगाव – श्री.नंदकिशोर महाजन
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली – श्री अरुण लखानी
भंडारा-गोंदिया – श्री अविनाश ब्राह्मणकर.                  अमरावती – श्री प्रविण पोटे पाटील.                             सांगली सातारा – श्री धैर्यशील कदम
सोलापूर – श्री राजेंद्र राऊत
अहिल्यानगर – श्री प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना – श्री सुहास शिरसाट
नांदेड – श्री अमर राजूरकर
धाराशिव-लातूर-बीड – श्री बसवराज पाटील
नागपूर – डॉ.राजीव पोतदार

दिल्लीतून झाली घोषणा
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी कुणाला संधी मिळणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. नावं निश्चित करण्यासाठी अनेक बैठकाही झाल्या होत्या. राज्यात झालेल्या बैठकांमध्ये ४८ जणांची नावे फायनल करण्यात आली होती. या ४८ नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर आज दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर आज रात्री या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!