भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

वाकी नाल्यात आढळले मृत बिबट्याचे पिल्लू ; परिसरात खळबळ, वन विभागाकडून पंचनामा

नशिराबाद, जि.जळगाव, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | नशिराबाद येथील वाकी नाल्यात एका बिबट्याचे मृत पिल्लू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वन विभागाने आवश्यक ती कार्यवाही करत घटनास्थळी पंचनामा केला.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत बिबट्याच्या पिल्ल्याची पाहणी केली. त्यानंतर संबंधित नियमांनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून पंचनामा करण्यात आला. तसेच पुढील तपासणीसाठी आणि मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी आवश्यक प्रक्रिया हाती घेण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली.

उपवनसंरक्षक, जळगाव विभाग, जळगाव श्री राम धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक, जळगाव वन विभाग श्री अमोल चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जळगाव श्री रामकृष्ण लामगे, वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे तसेच पशुधन विकास अधिकारी, नशिराबाद डॉ. विकास इंगळे उपस्थित होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!