भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावप्रशासन

जळगाव जिल्ह्यात पोलिस दलात नवीन अधिकारी, नाशिकचे अनिल बडगुजर फैजपूर विभागात पोलीस उपअधीक्षक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | राज्यातील १५६ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या पदोन्नतीच्या निर्णयाकडे राज्यभरातील पोलीस निरीक्षकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील ३५ पोलीस उपअधीक्षक/सहाय्यक आयुक्तांच्या बदल्याही करण्यात आल्या असून, पाच अधिकाऱ्यांची नव्या जागी पदस्थापना झाली आहे.

आय पी एस अन्नपूर्णसिंग यांची बदली झाल्या नंतर भुसावळचे पोलिस उप अधीक्षक कृष्णात पिंगळे याचे कडे काही दिवस  अतिरिक्त कारभार होता. या पार्श्वभूमीवर नाशिक एसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दिगंबर बडगुजर यांची फैजपूर विभागात पोलीस उपअधीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली करण्यात आली असून जळगावचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची भुसावळ विभागात बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मालेगावचे पोलीस उपअधीक्षक नितीन गणापूरे यांची नियुक्ती झाली आहे. तर, पोलीस निरीक्षक सुभाष दादा भोये यांची अक्कलकुवा विभागात तर नाशिक ग्रामीण डीएसबीचे निरीक्षक ज्ञानेश्वर निवृत्ती जाधव यांची धुळे मुख्यालयात पोलीस उपअधीक्षकपदी बदली झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!