भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : महसूल अधिकाऱ्यांसह खाजगी व्यक्तीला लाच घेताना जळगाव एसीबी कडून अटक

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखा मधील सहायक महसुल अधिकारी सह खाजगी व्यक्तीला याना दोन हजार रुपयांची लाच घेताना जळगाव एसीबी ने आज दिनांक २३ जुलै रोजी रंगेहात अटक केली.या घटनेने मोठी खळबळ उडाली.

यातील तक्रारदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.16/06/2025 रोजी त्यांचे गावातील ग्रामपंचायत व सदस्य यांचेविरुद्ध दाखल अतिक्रमण प्रकरणाची कागदपत्रांच्या नकला मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर तक्रारदार हे वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालय येथे महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर व खाजगी व्यक्ती संजय प्रभाकर दलाल यांना भेटले होते.तेव्हा त्यांनी नकला काढून देण्याच्या मोबदल्यात 2000/- रु . लाचेची मागणी केली होती त्याबाबत तक्रारदार यांनी दि.23/07/2025 रोजी ला. प्र. विभाग जळगांव येथे तक्रार दिली होती . सदर तक्रारी प्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता खाजगी व्यक्ती संजय दलाल यांनी “शासकीय फी व झेरॉक्सचे 1400/- रुपये व 600/- रुपये आमचे “असे म्हणून असे एकूण 2000/- रू . लाचेची मागणी केली. व प्रशांत सुभाष ठाकूर, यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले.

त्यानंतर संजय दलाल यांनी लाच रक्कम स्विकारली म्हणून प्रशांत सुभाष ठाकूर, वय- 49 वर्ष, धंदा-नोकरी, सहायक महसुल अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव खाते अभिलेख शाखा वर्ग 3.  व ) संजय प्रभाकर दलाल, वय 58 धंदा- खाजगी नोकरी, रा. शिव कॉलणी जळगांव ( खाजगी इसम ) यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. यांचे विरुद्ध जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी, श्री योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, ला. प्र. वि. जळगांव.
सापळा व तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे,पोलिस निरीक्षक , ला.प्र.वि. जळगांव. सापळा पथक सहापोउपनिरी सुरेश पाटील, पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/ अमोल सुर्यवंशी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!