भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमबुलढाणा

२५ हजारांची लाच भोवली, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासह लेखा पर्यवेक्षक एसीबी च्या जाळ्यात

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | शासनाच्या हमीभाव धान्य विक्री केंद्रावर विकलेल्या ज्वारीचे देयक लवकर अदा करण्यासाठी एका शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेताना बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे आणि पुरवठा विभागातील सेवा निवृत्त लेखा पर्यवेक्षक देवानंद खंडाळे यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. या कारवाई ने मात्र महसूल प्रशासनात मोठी खळबळ उडाली.

बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर ज्वारी विक्री केली आहे. विक्री केलेल्या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण न येऊ देण्यासाठी व त्यांना भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी लोकसेवक हे लाचेची मागणी करत होते. त्यानुसार दिनांक २१ ,२२ व २३ जुलै २०२५ , रोजी आयोजित केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान पुरवठा अधिकारी
गजानन टेकाळे व पुरवठा विभागातील सेवा निवृत्त लेखा पर्यवेक्षक  देवानंद खंडाळे यांनी तक्रारदार यांना ७०,०००  हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती – ५०,००० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व त्यापैकी लाचेचा पहिला हप्ता २५,००० रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवून व उर्वरित २५ हजार रुपये ज्वारीचे बिल निघाल्यानंतर स्विकारण्याचे मान्य केले.

त्यावरून दिनांक २३ जुलै रोजी आयोजित सापळा कार्यवाही दरम्यान पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांच्या वतीने पुरवठा विभागातील सेवा निवृत्त लेखा पर्यवेक्षक देवानंद खंडाळे यांनी पंचासमक्ष लाचेचा पहिला हप्ता २५,००० हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यावरुन, गजानन नंदकिशोर टेकाळे, वय ४०  वर्षे, व्यवसाय नोकरी पद -सहा. जिल्हा पुरवठा अधिकारी, सध्या प्रभार जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्ग २, , जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय, बुलढाणा. रा. खडकपुरा वार्ड नं २१  चिखली ता.चिखली जि. बुलढाणा.
आणि देवानंद गंगाराम खंडाळे वय ६२  वर्ष व्यवसाय सेवानिवृत्त लेखा पर्यवेक्षक, पुरवठा विभाग, रा. तानाजी नगर, बुलढाणा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन बुलढाणा शहर, जि. बुलढाणा येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक रमेश पवार, विलास गुंसिफे, एपीआय शाम भांगे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!