ब्रेकिंग : सावदा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ ची निवडणूक स्थगित
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क |निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ मधील प्रभाग क्रमांक ४ ‘ब’ मध्ये निवडणूक स्थगित करण्यात आल्याचे एक पत्रक जिल्हाधिकाऱ्यांसह नगरपालिकेला मिळाले आहे .या संदर्भात अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा निवडणूक विभागाकडून जाहीर झालेली नसली तरी स्थगिती मात्र मिळाली आहे.
या स्थगिती झालेल्या प्रभाग क्र. ४ ” ब” चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीरही करण्यात आला असून नवीन निवडणूक कार्यक्रम असा असेल…… निवडणूक कार्यक्रम ४ डिसेंबर रोजी जारी करण्यात येणार असून नाम निर्देशन पत्र १० डिसेंबर दुपारी ३ वाजे पर्यंत मागे घेता येणार, उमेदवारांची अंतिम यादी ११ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत राहील तसेच मत मोजणी २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजे पासून सुरू होणार आहे.
या प्रमाणे स्थगित झालेल्या प्रभाग क्रमांक ४ ब चा निवडणूक असणार असून प्रचार मोहीम शिगेला पोहोचत असताना अचानक या पत्रकामुळे सावदा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रभागात निवडणूक निर्णय अधिकारी विरुद्ध कोर्टात दावा दाखल झाल्याने निवडणूक स्थगितीची झाली असून निवडणूक होत असलेल्या इतर प्रभागाची निवडणूक ठरल्या प्रमाणे होणार असून मत मोजणी बाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज संध्याकाळ पर्यंत या बाबत माहिती देण्यात येणार आहे.


