भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : निकालासाठी वाट पहावी लागणार? आजच्या मतदानाचा निकाल १९ दिवसांनी? सस्पेन्स वाढला, मतदानाच्या दिवशीच न्यायालयातून मोठी बातमी

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | निवडणूक निकाल संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे.आज मतदान होत असलेल्या निवडणुकीचा निकाल तब्बल १९ दिवसांनी लागणार असल्याची माहिती मिळत आहे.राज्यातील काही ठिकाणची निवडणूक स्थगित करण्यात आली असून त्या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार असल्याने त्या दिवशी हा सर्व निकाल लागणार असल्याचे समजते. या बाबत मुंबई न्यायालय आज दुपारी निर्णय देणार आहे त्या मुळे आज मतदान होत असलं तरी निकाल केव्हा लागणार याचा सस्पेन्स वाढला आहे.

अवघ्या काही वेळापूर्वी राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी लाखो उमेदवारांचे भविष्य मत पेटीत बंदिस्थ होणार आहे. यासर्व निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार असल्याचं निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केलं आहे. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी मुंबई हाय कोर्टातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आज मतदान होत असलं तर याचा निकालासाठी अजून १९ दिवसांची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती मिळत आहे. त्या मुळे मात्र निकाल केव्हा लागणार ? याच सस्पेन्स वाढला आहे.

राज्यातील अनेक प्रभागात मतदार,आरक्षण अशा अनेक प्रकारचे घोळ समोर आल्याने मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतला घोळ समोर आल्यानंतर राज्यातील काही नगर परिषदा आणि नगर पंचायतीचं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. उर्वरित ठिकाणी आज म्हणजे २ डिसेंबरला मतदान पार पडत आहे.हा निकाल उद्या ३ डिसेंबरला लागणार असल्याचे आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

ज्या ठिकाणंचं मतदान पुढे ढकललं आहे. तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे. राज्यातील सर्वच ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रित लावता येईल का? अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाची निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचं निवेदन आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक आयोग खंडपीठाकडे देणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!