ब्रेकिंग : बस स्थानकात तरुणावर गोळीबार, तब्बल ५ गोळ्या झाडल्या, तरुण जागीच ठार
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | बस स्थानक परिसरात तरुणावर तब्बल एका पाठोपाठ एक अशा पाच गोळ्या झाडून आकाश मोरे उर्फ सँडी या २६ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात घडली. ऐन गर्दीच्या ठिकाणी बस स्थानक परिसरामध्येच गोळीबाराचं थरार रंगल्याने प्रवाशांची धावपळ झाली. आकाशचा जागीच मृत्यू झाला. या घटने ने पाचोरा बस स्थानक परिसरात मोठी खळबळ उडाली. ही घटना पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
मोटरसायकलवर येऊन अज्ञात व्यक्तींनी आकाशवर धडाधड पाच गोळ्या झाडल्या. तरुणावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आकाश कैलास मोरे याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. घटनेनंतर परिसर पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्येमागील कारणांचा शोध पोलीस घेत आहेत.

