भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्याचे निलंबन, आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी उप विभागीय अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मौजे संगमेश्वर आणि गुगळगाव येथील भूखंड अदलाबदलीतील गैरव्यवहार प्रकरणी उपविभागीय अधिकारी उदय किसवे यांचे तात्काळ निलंबन करण्यात येत असल्याची घोषणा महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

या प्रकरणी आठ मुद्रांक अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश देत बावनकुळे यांनी दोषींवर कडक कारवाईचे संकेत दिले. तसेच स्टॅम्पवेंडर जाकीर आणि आरिफ अब्दुल लतीफ यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

उदय किसवे यांनी संगमेश्वरची जमीन गुगळगावला आणि गुगळगावची जमीन संगमेश्वरला स्वॅप करून नियमांचा भंग केला. यामुळे त्यांचे निलंबन करत एका महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन बावनकुळे यांनी यावेळी दिले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!