१२ हजारांची लाच : दोन पोलिसांसह खाजगी इसमाला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | अवैधरित्या गॅस रिफिलिंगचा व्यवसाय करू देण्यासाठी दरमहा १५ हजारांची लाच द्यावी लागेल अन्यथा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देत तडजोडीअंती १२ हजारांची लाच खाजगी पानटपरी चालकाच्या माध्यमातून स्वीकारताना अमळनेर पोलिस ठाण्याच्याbपोलिस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील वय ३६ वर्षे. व जितेंद्र रमणलाल निकुंभे वय ३३ वर्ष या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह पानटपरी चालक उमेश भटू बारी वय ४६ वर्ष, सहारा टॉवर. लोकमान्य शाळेजवळ, अमळनेर. याना धुळे एसीबीने मंगळवार २३ सप्टेबर रोजी रात्री उशिरा अटक केली. या घटनेने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे अमळनेरच्या धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एका टपरीत एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचे काम करतात. त्यांना पोलिस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी हा अवैध व्यवसाय करायचा असल्यास दरमहा १५ हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगत अन्यथा तुझ्यावर अवैधरित्या वाहनात गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. मात्र तक्रारदारांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार दिली.
त्या नुसार धुळे एसीबीचे पथक मंगळवारी दुपारपासून अमळनेरात दाखल झाले. व सापळा प्रमाणे दोघी पोलिसांनी लाचेची रक्कम बहादरपूर रोडवरील पाचपावली मंदिरासमोरील मिनाबाई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्समधील स्वराज्य पान दुकानदार उमेश बारी यांच्याकडे देण्यास सांगितली.
त्या प्रमाणे पण टपरी धारक बारी यांनी लाच स्वीकारताच पानटपरी चालकाला व नंतर पोलिस कॉन्स्टेबल अमोल राजेंद्र पाटील व जितेंद्र रमणलाल निकुंभे या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली.ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, हवालदार सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने केली.

