मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे शनिवारी नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | यावल तालुक्यातील पिंपरुड येथील मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे शनिवारी नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दर महिन्याप्रमाणे शनिवार २७ सप्टेंबर २०२५ रोजी मातोश्री फाऊंडेशन पिंपरुड तर्फे गट क्र ४३९,फैजपूर रोड, पिंपरुड फाटा येथे सकाळी १० ते १ वाजेपर्यंत कांताई नेत्रालय जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे, तरी पंचक्रोशीतील सर्व गरजू जनतेने मोठ्या संख्येने शिबिरांचा लाभ घ्यावा असे आवाहन मातोश्री फाउंडेशन चे अध्यक्ष श्री जनार्दन जंगले व उपाध्यक्ष चंद्रकांत जंगले यांनी केले आहे.

