भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमरावेर

ब्रेकिंग : १५ हजारांची लाच ; रावेर वनपालासह पंटर जळगाव एसीबी च्या ताब्यात

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रावेर तालुक्यात जळगाव च्या लाच लुचपत विभागाने वनविभागाच्या वनपालाला लाच प्रकरणी अटक केली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी १५ हजारांची लाच फोन पे द्वारे स्वीकारणाऱ्या रावेर विभागाच्या वनपाल राजेंद्र सरदार सह पंटर ला जळगाव एसीबीने अटक केली आहे.

वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई टाळण्यासाठी तक्रारदाराला रावेरचे वनपाल राजेंद्र सरदार याने लाच मागितली. वनपालाने १५ रुपये लाच फोन पे द्वारे स्वीकारली. वनपालाला खाजगी पंटर दीपक तायडे याने मदत केली. जळगाव एसीबी ने वनपाल राजेंद्र सरदार व खाजगी पंटर दीपक तायडे यांना अटक केली आहे. या कारवाईने वनविभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव लाच लुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात निरीक्षक हेमंत नागरे व सहकाऱ्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!