भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

अमळनेरआरोग्यक्राईमजळगाव

गायीच्या दुधाला म्हशीच्या दुधाची ‘मलई’! जळगाव जिल्ह्यात भेसळयुक्त दुधाचा ‘सफेद धंदा’ ; सोयाबीन तेल मिसळून दूध विक्री

जळगाव.मंडे टु मंडे न्युज | गायीच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी त्यात थेट सोयाबीन तेल मिसळून हे भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार अमळनेर तालुक्यातील जानवे येथे उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि अमळनेर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत या प्रकाराचा पर्दाफाश झाला असून, एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील जानवे ते इंदापिंप्री रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये गायी-म्हशींच्या गोठ्याच्या आड भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रविवारी (दि. ३०) दुपारी साडेतीनच्या सुमारास संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.

कारवाईदरम्यान महेश दिलीप पाटील (वय २७, रा. जानवे) हा गायीच्या दुधाची फॅट वाढवण्यासाठी त्यात सोयाबीन तेल मिसळताना आढळून आला. प्राथमिक तपासात १० लिटर भेसळयुक्त दूध तयार करून ते सुमारे १०० लिटर गायीच्या दुधात मिसळले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर हे दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून धुळे शहरात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची फिर्याद
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आकाश कैलास बोऱ्हाडे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४५२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(१), २७(३), ३१(१), ३१(२), ५९ तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम २७४, २७५, १२३ आणि ३१८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

४,३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त
संयुक्त कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाy आहे. कारवाईनंतर अमळनेर पोलिसांनी आरोपी महेश पाटील याला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!