भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

बढतीसाठी मागितले २५ लाख, माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची हकालपट्टी…

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लीलावती रुग्णालयाने बडतर्फ केलं आहे. परमबीर सिंग यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत डॉक्टरांवर कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला होता. डॉक्टरांकडून बढतीसाठी २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली सिंग यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञांनीच त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केल्याचं समोर आलं आहे. परमबीर सिंग यांनी लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात कथित १२०० कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून बढतीसाठी २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर परमबीर सिंग यांची जुलै २०२४ मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयात अनेक मोठे वाद झाले होते.

त्यांनी रुग्णालयातील माजी विश्वस्तांनी केलेला घोटाळा उघड केल्याचा दावा केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर लगेचच त्यांची तडकाफडकी कार्यकारी संचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

अशातच सिंग यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रत्येकी २५ लाख खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत त्यांना रुग्णालयाने बडतर्फ केलं आहे. तसंच सिंग यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत डॉक्टरांवर कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्तांनी परमबीर सिंग यांनी रुग्णालयात अंतर्गत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही केला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!