महिला डॉक्टरचा विनयभंग : मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सहकारी डॉक्टर महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी जळगाव महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या पूर्वीच डॉ घोलप यांना महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निलंबित केले होते.
सहकारी महिला डॉक्टरचा विनयभंग आणि जन्म-मृत्यू विभागात पत्नीच्या जागेवर पतीला रूजू केल्याच्या आरोप डॉ घोलप यांचेवर आहे.
महापालिकेच्या छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात पीडित महिला डॉक्टर चा विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिला डॉक्टर ने पोलिसात केली होती. त्या नंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्या तक्रारीवरून दाखल गुन्ह्यात आता डॉ. घोलप यांना अटक करण्यात आली असल्याने महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

