भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमभुसावळ

अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावस काकाकडून लैंगिक अत्याचार

भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | मावशी कडे रहाण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच मावशीच्या पतीकडून म्हणजेच मावस काकाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना भुसावळ शहरातून उघडकीस आली.

आई-वडिलांमध्ये कौटुंबिक वाद असल्याने पीडित मुलगी आईसोबत राहत होती. मात्र आई नोकरी करत असल्यामुळे मुलगी नातेवाइकांकडे वेळोवेळी राहत असे. ती पीडित मुलगी नाशिक येथे असून शिक्षण घेत आहे काही दिवसांसाठी ती भुसावळ येथील मावशीकडे राहण्यासाठी आली होती. मात्र, मावशी कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने पीडित मुलगी घरात काका व लहान भावासोबतच राहत होतो.

दि. १६ सप्टेंबर रोजी सकाळी काकाने अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती केली असता मुलीने विरोध केल्यावर तिला मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पुन्हा त्याच रात्री काकाने मध्यरात्री पीडितेवर पुन्हा जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला.

मारण्याची धमकी दिल्या मुळे आतापर्यंत भीतीने गप्प राहिलेल्या मुलीने अखेर दि.१८ सप्टेंबर रोजी त्रास सहन न झाल्याने अखेर घडलेला प्रकार आई व मावशीला फोनवर सांगितला. लागलीच आई व मावशी १९ सप्टेंबर रोजी परत आल्या. व त्यांनी पीडित मुलीला सोबत घेऊन बाजारपेठ पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आरोपी काकाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!