चोपडासामाजिक

संघटनेचे बळ समाज प्रगतीचे द्योतक – प्राचार्य के. सी. पालीवाल यांचे प्रतिपादन

चोपडा, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कोणत्याही समाजाची प्रगती ही त्यांच्या समाजातील आचार, विचार व संस्कारासह त्यांच्या समाज संघटन शक्तिबलावर अवलंबून असते. यामुळेच संघटन शक्ती हेच समाज प्रगतीचे द्योतक असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ प्राचार्य के. सी. पालीवाल यांनी चोपडा पालीवाल पंचायततर्फे आयोजित नारी शक्ती सन्मानप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना केले.

शहरातील आनंदराज पॅलेसमध्ये आयोजित या कार्यक्रमात बारा ज्येष्ठ मातृशक्तीचा सन्मानपत्र, साडी आहेर, तुळशीमाळ, गीतासार प्रदान करून सौ. शशिकला पालीवाल व स्थानिक महिला मंडळ सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यात श्रीमती उमाबाई पालीवाल, श्रीमती कमलाबाई पालीवाल, श्रीमती जसोदाबाई पालीवाल, श्रीमती विजयाताई पालीवाल, श्रीमती सुनीता पालीवाल, श्रीमती कमलबाई पालीवाल, श्रीमती प्रमिलाबाई पालीवाल, श्रीमती कोकिळा मगनलाल पालीवाल,श्रीमती प्रेमाबाई पालीवाल, श्रीमती भिकुबाई पालीवाल यांना सन्मानित करण्यात आले.


मान्यवरांचा सत्कार
याप्रसंगी गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये कथक नृत्यात समाविष्ट पालीवाल समाजातील कु. सौम्या विजय पालीवाल, कु.भाव्या हेमंत पालीवाल (मंदसौर), कु. अनन्या पालीवाल, कु. मोक्षदा कानुनगो, कु. सानवी मंडलोई (सेंधवा) यांना स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन अध्यक्षांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच समाजातील ज्येष्ठ मार्गदर्शक श्री.भालचंद्र चुनिलाल पालीवाल यांना जीवनगौरव पुरस्काराने चोपडा पालीवाल समाजातर्फे सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. गिरीश कानूनगो यांनी आपल्या मनोगतात चोपडा पालीवाल समाजाची वाटचाल दैदिप्यमान पणे सुरू असून भविष्यातही समाजाचा नावलौकिक अधिकाधिक वाढत राहो, अश्या शब्दांत शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचा शुभारंभ मां आशापूर्णा प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष प्रदीप पालीवाल, सचिव डॉ. विशाल पालीवाल, उपाध्यक्ष गिरीश पालीवाल, नागेंद्र पालीवाल, कोशाध्यक्ष राजेंद्र पालीवाल यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाराष्ट्र पालीवाल परिषदेचे महामंत्री अनिलकुमार पालीवाल आणि सौ. रुपाली विशाल पालीवाल यांनी केले. याप्रसंगी सोयत महिला मंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या सौ. राजश्री पालीवाल यांचे स्वागत सौ. किरण पालीवाल यांनी केले. कार्यक्रमात फाग उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. निर्मल टाटीया यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगरसेवक चंदुलाल पालीवाल, सुरेश पालीवाल, हरिओम पालीवाल खंडवा, विकास पालीवाल, ओमप्रकाश पालीवाल, दिलीप पालीवाल, दीपक पालीवाल लासूर, जितेंद्र पालीवाल चौगाव, दमयंती पालीवाल, आदी शेकडो समाजबांधव, महिला मंडळ व युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री महेश पालीवाल, अशोक पालीवाल, संदीप पालीवाल, सौ. रुपाली पालीवाल, सौ.किरण पालीवाल, सौ. सीमा पालीवाल, आदींनी परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन व स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!