रावेरशैक्षणिक

रावेर येथे खुल्या सब ज्युनिअर कॅडेट तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा उत्साहात

रावेर,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर येथे रावेर तालुका तायक्वांदो असोसिएशन व स्वामी स्पोर्ट क्लब द्वारा आयोजित खुल्या सब ज्युनिअर अँड कॅडेट कुरोगी तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धा नुकत्याच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर येथे पार पडल्या, रावेर व परिसरातील खेळाडूंना तायक्वांदो खेळात प्रगती व्हावी आणि मुलींच्या आत्मरक्षणासाठी व मुलांच्या शारीरिक दृष्ट्या सुदृढ होण्यासाठी चालना मिळावी या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धा शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानी रावेर ता.तायक्वांदो असो.चे उपाध्यक्ष डॉ संदीप पाटील हे होते. दीपप्रज्वलन तायक्वांदो असो. अध्यक्ष दिपक नगरे व स्वामी एज्युकेशन ग्रुप चे अध्यक्ष रवींद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेमध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, स्वामी इंग्लिश मीडियम, सरदार जी हायस्कूल कमलाबाई गर्ल्स हायस्कूल, सरस्वती विद्या मंदिर, अकोले विद्यालय, मॉडर्न इंग्लिश स्कूल, श्रीराम मॅक्रो विजन एकेडमी, स.व.प. ऐनपुर, सूर्यपुंज शहापूर मदर्स लॅब, यशवंत विद्यालय रावेर अशा एकूण 12 शाळेतील 181 खेळाडूंनी सहभाग नोंदविला तर तर स्पर्धेतील प्रथम विजेतेपद सरदार वल्लभाई पटेल ऐनपुर यांनी पटकावले, द्वितीय सूर्यपुंज शहापूर, तृतीय स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर. यांनी मिळवत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल असोसिएशन चे खजिनदार आयुष अग्रवाल रावेर शिक्षण संवर्धक संघाचे अध्यक्ष डॉ.दत्ताप्रसाद दलाल, गणेश धांडे, राजू पवार, पारितोषिक सौजन्य ओंकार इंटरप्राईजेस चे संचालक किरण सावळे याच्या हस्ते यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिरीष मैराले, श्रीकांत महाजन सर, जयेश कासार सर, विष्णू चारण सर, कल्पेश नगरे, हेमंत गायकवाड, दिनेश चौधरी, श्रीकांत महाजन, यश जाधव, सिद्धार्थ तायडे, प्रबुद्ध तायडे, महिमा पाटील यांनी पंच म्हणून काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपेश पाटील सर यांनी केले तर आभार जीवन महाजन यांनी मानले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!